Share

माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का? : संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह खासदार छत्रपती उदयनराजे भोसले देखील सक्रिय झाले आहेत. मात्र अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींचे वंशज असलेल्या संभाजीराजे व उदयनराजेंवर बोचरी टीका केली असून आता यावर दोन्ही राजेंच्या समर्थकांसह मराठा नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

तर, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडेंवर देखील निशाणा साधला आहे. ‘प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याच्या वंशजांसदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही. परंतु, माझ्याकडून अशाप्रकारचं विधान झालं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मग तेच संभाजी भिडे आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का?’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

यापूर्वी संजय राऊत यांनी देखील अशा प्रकारचं वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर संभाजी भिडेंनी आंदोलनाची हाक दिली होती. याचाच संदर्भ घेत ‘आताही ते सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का?’ असा खोचक सवाल संजय राऊत यांनी संभाजी भिडे गुरूजींना केला आहे.

प्रकाश आंबेडकरांची उदयनराजेंवर जहरी टीका

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी, जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्वांचेच आरक्षण रद्द करून फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे म्हणजे गरिबांवर अन्याय होणार नाही असं वक्तव्य केलं होत. यावरूनच प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या