🕒 1 min read
नवी दिल्ली- हाथरस प्रकरणाबाबत देशात तीव्र संताप वाढला चालला आहे. या प्रकरणावरून योगी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. योगी सरकारने कुणाच्या आड लपून राजकारण करणे थांबवून आणि ज्या ठिकाणी आपले सरकार आहे, तिथेली माता भगिनींना सुरक्षित वातावरण दिले तर ते अधिक गरजेचं राहिल, असा सल्ला विरोधक आता भाजपला देऊ लागले आहेत.
देशात अराजक माजलं आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. यूपीत कायद्याचं राज्य नाही. दडपशाही सुरू आहे, असं सुनावतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी असून योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकाराबद्दल स्वत:ची चूक कबूल करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत असे मत केंद्रीय महिला आणि स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं.एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, महिलांची संख्या ही समाजात अर्ध्या स्वरूपात जरी असली तरी त्यांचा प्रभाव समाज, राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर असतो. भारताने आपल्या विकासात सर्व स्तरांवर लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बदल स्वीकारत आम्ही लोकसभा निवडणुकीच्यावेळी महिलांच्या विकासाठी करण्यात आलेल्या आश्वासनांना पार करत पुढे गेलो आहोत असे स्मृती इराणी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस कार्यकर्तेही भाजप नेत्यांची कॉलर धरू शकतात, मात्र…
- ‘देशात अराजक माजलं आहे,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी’
- मुंबई इंडियन्सचा नाद खुळा;किंग्ज इलेव्हन पंजाबचा दारूण पराभव करत गाठले अव्वल स्थान
- विवेक रहाडे यांच्या कुटुंबियांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट,पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले
- भाजपच्या सरकारच्या दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही : थोरात

