🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातलं ट्विटरयुद्ध अद्यापही सुरु आहे . कंगनाची सरकारवर आरोपांची मालीका सुरूच असून आता कंगनाने बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
कंगनाने तिच्या ट्विटमधून शिवसेनेला राजकीय प्रश्नही विचारायला सुरुवात केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत कंगनाने आघाडी करुन शिवसेनेची एक दिवस काँग्रेस होईल असं म्हणल्याचा हा व्हीडीओ आहे. आज शिवसेनेची परिस्थिती पाहून काय वाटत असेल असा सवाल कंगनाने केला आहे.
Great Bala Saheb Thakeray one of my most favourite icons, his biggest fear was some day Shiv Sena will do Gutbandhan and become congress @INCIndia I want to know what is his conscious feeling today looking at the condition of his party ? pic.twitter.com/quVpZkj407
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 11, 2020
कंगनाच्या ऑफिसवर तोडकाम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जेव्हा पोहोचले तेव्हा कंगनाने ही बाबरची सैन्य असल्याचं म्हटलं., ‘मणिकर्णिका सिनेमाची अयोध्येत घोषणा झाली होती. त्यामुळे हे ऑफिस मला राम मंदिराप्रमाणेच आहे. आज इथं बाबर आले. इतिहास पुन्हा एकदा घडणार आहे. ज्या प्रकारे राम मंदिर पुन्हा बनलं. तसंच हे ऑफिसही परत तयार होणार आहे", असं कंगना म्हणाली.
महत्वाच्या बातम्या
रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ उतरली काँग्रेस
चीनने भारताची जमीन घेतली हे देखील देवाची करणी आहे का ?- राहुल गांधी
‘शिवसेना बदनाम हुई, डार्लिंग सत्ता के लिये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
