🕒 1 min read
कोलकाता: अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ आता काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. काही दिवसांपूर्वी रियाला अटक झाली असून सध्या ती पोलीस कोठडीत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षांनी अधीर रंजन चौधरी यांनी रियाला समर्थन दिले आहे. चौधरी यांनी बंगाल काँग्रेसची धुरा आपल्या कडे आल्यानंतर त्यांनी हा आक्रमक मुद्दा उचलला आहे. रियाची बाजू घेतानाच त्यांनी रिया ही ‘बंगाली ब्राह्मण महिला’ असल्याचं म्हटलंय. सुशांतला न्याय मिळवून देण्याची व्याख्या, बिहारसाठी न्यायाची व्याख्या असायची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
सुशांतसिंह राजपूत हा भारतीय अभिनेता होता. पण भाजपाने निवडणुकीत फायदा घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकले, अशी टीका करत त्यांनी अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला.
‘दिवंगत सुशांत सिंह राजपूत एक भारतीय अभिनेता होता. भाजपनं त्याला केवळ बिहारी अभिनेता बनवून टाकलं. हे केवळ निवडणुकीतील फायद्यासाठी करण्यात आलंय. रियाचे पित्यालाही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्याचा अधिकार आहे. मीडिया ट्रायल आपल्या न्यायिक प्रणालीचा बेकार हिस्सा आहे. सर्वांना न्याय मिळणं हाच आपल्या संविधानाचा मूळ सिद्धांत आहे’ असंही अधीर रंजन चौधरी यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘शिवसेना बदनाम हुई, डार्लिंग सत्ता के लिये’
मुख्यमंत्र्यांचा अवमान करण्याची गुर्मी कंगनाला कुठून आली- प्रशांत गडाख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
