🕒 1 min read
अहमदनगर /ऋषिकेश घोगरे:- विखे पाटील यांचा मूळ स्वभाव हा कॉंग्रेस विचारधारेचा आहे. ते आजही त्याच विचाराचे आहेत. ते पक्षात असताना, पहिल्या फळीचे राज्याचे नेते होते. त्यांना भाजपात जाण्यास विरोध करणारे आपणच होतो. ते तिकडे गेले असले तरी भाजपमध्ये मन रमत नसल्याचे आमच्या लक्षात येते आहे. त्यामुळे भविष्यात ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये दिसले, तर नवल वाटायला नको. असे मत कॉंग्रेस पक्षाचे नेते हेमंत ओगले यांनी व्यक्त केले आहे.
विखे कुटुंब कोणत्याही पक्षात असेल तरी त्यांचे स्थान नेहमीच वरचे राहिले आहे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात विखे पाटील कुटुंबाची छाप आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून या घराण्याचा राजकारण, समाजकारणासह विविध क्षेत्रात नावलौकिक आहे. मूळ काँग्रेस विचारांचे असलेले हे घराणे आहे. नंतर बदलत्या राजकारणात हे घराणे शिवसेनेत गेले. मात्र, तेथेही ते रमले नाहीत. घरवापसीनंतर पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. डॉ.सुजय विखे पाटील यांच्यामुळे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनाही भाजपात जावे लागले. परंतु भविष्यात हे कुटुंब पुन्हा काँग्रेसमध्ये दिसले तर नवल वाटायला नको, असे ओगले म्हणाले.
विखे घराण्याचा भाजप प्रवेश अनेकांना रूचला नाही. त्यांचे कार्यकर्ते भाजपविचारांशी अजूनही एकरूप झालेले नाहीत. त्यातून त्यांच्या घरवापसीची चर्चा होत असते. ते भाजपात गेले असले तरी काँग्रेसमध्ये आजही त्यांना मानणारा गट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विखे कुटुंब हे काँग्रेसमध्ये दिसेल असा विश्वास हेमंत ओगले यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:-
मुंबई पोलीस कंगनाची ड्रग्ज संबंधी कसून चौकशी करणार
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
