Share

नारायणराव तापकीर यांच्या निधनाने पुण्याच्या शैक्षणिक चळवळीची हानी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Published On: 

पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव नारायणराव तापकीर यांचं निधन झाल्याची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने पुण्याच्या शैक्षणिक चळवळीचं मोठं नुकसान झालं असून सामाजिक, शैक्षणिक चळवळीत तळमळीने कार्य करणारा सच्चा सहकारी मी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, नारायणराव तापकीर यांनी पुण्याच्या सामाजिक, शैक्षणिक चळवळीत दीर्घकाळ मोलाचं योगदान दिलं. पुणे शिक्षण मंडळाचे मानद सचिव म्हणून त्यांचं कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांचे बंधू माजी आमदार अशोक तापकीर यांचं काही महिन्यांपूर्वी झालेल्या निधनानंतर आज नारायणराव तापकीर यांच्या निधनाने तापकीर कुटुंबावर झालेला आघात मोठा आहे.

या दु:खातून सावरण्याची शक्ती तापकीर कुटुंबियांना मिळो, आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह संपन्न

लवकरच पेंग्विन ‘या’ केसमध्ये सापडणार; निलेश राणेंचा घणाघात

अन तुकाराम मुंढे झाले भावुक, म्हणाले..गुडबाय एनएमसी!

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!