🕒 1 min read
मुंबई : गेले काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण हे तापले असून अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलीस आणि व्यवस्थेवर आवाज उठवल्यानंतर शिवसेनेनं हा मुद्दा ‘मराठी अस्मिता, मुंबई पोलिसांची कार्यक्षमता’ या विषयांवर पोहोचवला.
दरम्यान, विधानसभा निकलानंतर शिवसेनेने अचानक भाजपसोबत असलेला महायुतीचा संसार मोडत विरोधी विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. सर्वाधिक आमदार असलेला पक्ष असून देखील भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले होते. यानंतर हे तीनचाकी सरकार असून अधिक काळ टिकणार नाही असे म्हणत कोणतीही संधी न सोडता सरकारवर लक्ष्य सुरु ठेवले.
तर सुरुवातीपासुनच भाजपने देखील सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासावरून शंका घेत सीबीआय चौकशीची मागणी करत महाविकास आघाडीला घेरले होते. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात अनेक बड्या व्यक्तींची नावे येत असून मुंबई पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता.
सद्या या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून वातावरण देखील तापलेलं पहायला मिळत आहे. यातच, भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी शिवसेना बदनाम झाल्याची खोचक टीका त्यांनी केले आहे. “एक मशहूर ग़ीत क़ा विडंबन सोशल मीडिया पर खूब चल रहा है ! शिवसेना बदनाम हुई .. डार्लिंग सत्ता के लिए ” असे ट्वीट करत राम कदम यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.
एक मशहूर ग़ीत क़ा विडंबन सोशल मीडिया पर खूब चल रहा है ! शिवसेना बदनाम हुई ..
डार्लिंग सत्ता के लिए ..— Ram Kadam (@ramkadam) September 10, 2020
महत्वाच्या बातम्या:-
राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह संपन्न
लवकरच पेंग्विन ‘या’ केसमध्ये सापडणार; निलेश राणेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
