🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवरून सध्या देशभरात गदारोळ सुरु आहे. आता कंगनाच्या अडचीण वाढण्याची शक्यता आहे . आता मुंबई पोलिसांनी तिच्याविरूद्ध अंमली पदार्थांच्या दुव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.एका वर्त्तवाहिनीशी बोलताना मुंबई पोलिसांनी हि माहिती दिली आहे.
याआधी कंगनाने कधी ड्रग्सचे सेवन केले आहे का? याचा शोध आता मुंबई पोलीस करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अध्ययन सुमनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना 2016 मधल्या एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं होतं की, कंगना मादक पदार्थांचं सेवन करते. इतकंच नाही तर ती ड्रग्ज घेण्यासाठी मलाही भाग पाडते असंही त्याने म्हटलं होतं अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आता याचा कसून तपास करणार आहे.
दरम्यान बीएमसीने गनाच्या कार्यालयाचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे सांगत तोडला. त्यानंतर अद्यापही कंगनाचं ट्विटरयुद्ध सुरूच आहे. ती वारंवार मुंबई पालिका आणि शिवसेनेविरोधात वक्तव्य करीत आहे.तसेच तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने तिच्यावर टीका होत आहे.
लवकरच पेंग्विन ‘या’ केसमध्ये सापडणार; निलेश राणेंचा घणाघात
अन तुकाराम मुंढे झाले भावुक, म्हणाले..गुडबाय एनएमसी!
करोनाचा प्रादुर्भाव आता संपला ; भाजपा नेत्याचा दावा

