Share

लवकरच पेंग्विन ‘या’ केसमध्ये सापडणार; निलेश राणेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुशांतसिंह राजपूतची मँनेजर दिशा सालीयनने आयोजित केलेल्या एका पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री नुपूर मेहता यांनी केला आहे. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. आता यावरून नवीन वादंग निर्माण झालं आहे.

काल ‘महाराष्ट्र देशा’ने यासंदर्भात वृत्त दिल्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा घणाघात केला असून सत्य लवकरच बाहेर येईल असं भाकीत देखील वर्तवल आहे. गेले अनेक महिने हे प्रकरण आदित्य ठाकरेंच्या भोवती फिरत होत मात्र आदित्य ठाकरे यांनी ठाकरे घराण्याला व महाराष्ट्राला लांच्छन लागेल असे कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगितले होते.

यानंतरही विरोधकांचा रोख मंत्री आदित्य ठाकरेंवर कायम राहिला, त्यातच कंगनाने मुंबई पोलिसांच्या तपासावर व व्यवस्थेवर प्रश्न उभे केल्याने वातावरण अधिक तापलं होत. आता निलेश राणे यांनी, ” कितीही लपवलं तरी सत्य एक ना एक दिवस बाहेर येतं. मागच्या 75 दिवसांमध्ये अनेक वेळा विषय वळवण्याचे व पुरावे नष्ट करण्याचे प्रयोग झाले पण सगळं झाकणं कोणाला शक्य नाही म्हणून लवकरच पेंग्विन ह्या केस मध्ये सापडणार.” असा आरोप देखील लावला आहे.

कोण आहे दिशा सालियान?

दिशा सालियान ही सुशांतची मँनेजर होती. तिचं सुशांतच्या घटनेआधी निधन झाले होते. दिशाच्या मृत्यूवर देखील नेहमीच शंका घेतली जाते आणि नंतर या घटनेला सुशांतसिंग प्रकरणाशीही संबंध असल्याचे अनेकांनी आरोप केले आहेत. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे बघणं महत्त्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या:-

अन तुकाराम मुंढे झाले भावुक, म्हणाले..गुडबाय एनएमसी!

#Wistle_Podu : महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक वेळा प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात धडक मारणारा संघ…

करोनाचा प्रादुर्भाव आता संपला ; भाजपा नेत्याचा दावा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!