Share

अन तुकाराम मुंढे झाले भावुक, म्हणाले..गुडबाय एनएमसी!

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : प्रबळ इच्छाशक्ती, शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सात महिन्यांच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळातील साडे पाच महिने कोरोना महामारीविरुद्ध यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करण्याचा योग आला, असे तुकाराम मुंढे यांनी काल (दि. १० सप्टेंबर) स्पष्ट केले.

तुकाराम मुंढे यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यातून त्यांनी नागपूरचे नागरिक, इतर अधिकारी व सहकारी यांना भावनिक आवाहन त्यांनी यातून केले आहे. त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले असून गेल्या ७ महिन्यात निर्माण झालेलं नातं ‘पर्मनंट’ असेल असं देखील ते म्हणाले. तसेच येत्या काळात शहराची जडण-घडण योग्य दिशेने करण्यासाठी एकमेकांच्या सोबतीने काम करून पुढे जावे लागेल असा संदेश देखील कर्मचारी व नागरिकांना त्यांनी दिला आहे.

गेल्या ७ महिन्यात निर्माण झालेलं नातं आपल्याला अधिक घट्ट करायचे असून ‘माझी दारं कायमस्वरूपी खुली असल्याचे’ देखील त्यांनी सांगितले. मी माझ्यापरीने ७ पाऊले टाकली असून आपण ३ पाऊले टाकावीत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. सविस्तर व्हिडिओ थोड्याच वेळात ‘महाराष्ट्र देशा’ वर उपलब्ध होईल.

दरम्यान, नागपूर पालिका आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती केलेल्या तुकाराम मुंढे यांची ती पण बदली रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंढेंच्या बदलीचा सस्पेंस क्रीएट झाला आहे.

मुंढे हे आता विनापदाचे असून त्यांच्यासाठी नवीन पोस्ट शोधली जात असल्याची माहिती आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ते पण स्वभावाने तिखट आहेत. त्यांचा आणि मुंढे यांचा सामना कसा रंगणार, याची उत्सुकता होती. मात्र मुंढे हे तेथे रूजू होण्याच्या आधीच त्यांची तेथील बदली रद्द झाली.

महत्वाच्या बातम्या:-

#Wistle_Podu : महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक वेळा प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात धडक मारणारा संघ…

करोनाचा प्रादुर्भाव आता संपला ; भाजपा नेत्याचा दावा

भारत- चीनमध्ये तणाव मिटण्याची शक्यता

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!