Share

अंतिम वर्ष परीक्षा : उदय सामंतांनी घेतली राज्यपालांची भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ३१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा घेण्यासाठी वाढीव मुदतीची मागणी केली.

या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, औरंगाबाद विद्यापीठ, SNDT, सोलापूर विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, गोंडवाना, कलसंचनालय, BATU, जळगाव विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी युजीसीकडून ३१ ऑक्टोंबर पर्यंत तर अमरावती व यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाने १० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना घेतलं ताब्यात!

यानंतर, मंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, एस. सी. एस. जलोटा यांच्यासमवेत सामंतांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देखील परीक्षा सोप्या पद्धतीने घेतल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे, उदय सामंत यांनी सांगितले.

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची शिवसेना नेते नागेश वनकळसे यांची मागणी

दरम्यान,  मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा देता येतील अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सुचना दिल्या असून ऑनलाइन पद्धतीने जरी परीक्षा घेतल्या गेल्या तरी त्याचा पॅटर्न कसा असेल? राज्यातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच इतर बाहेर राज्यातुन आलेल्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर पडेल का? अशा निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर लवकरच खुलासा केला जाऊ शकतो.

काँग्रेसच्या माजी खासदारांच निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!