🕒 1 min read
गडचिरोली : जिल्ह्य़ातील नक्षलवादाचा कणा मोडण्यासाठी राज्य सरकारने विकासावर भर दिला आहे. विकासाची फळे स्थानिक जनतेला मिळू लागल्यावर आपसूक नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल, असा विश्वास राज्याचे नगरविकासमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. प्राणहिता नदीवरील सिरोंचाजवळील इंद्रावती नदीवरील पातागुडाम येथील पूल, बेजुरपल्ली-अहेरी रस्त्यावरील लंकाचेन येथील पूल व बेजूरपल्ली-देवलमरी-अहेरी रस्ता, गरंजी-पुस्टोला रस्ता दुरुस्ती अशा झालेल्या कामांचे उद््घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच पेरमिली, बांडिया, पर्लकोटा व वैनगंगा नदीवरील चार नवीन आवश्यक पुलांच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी शिंदे बोलत होते. ते म्हणाले, आगामी काळात गडचिरोली जिल्हय़ाच्या विकासाला चालना मिळणार आहे. अहेरी, भामरागड, लाहेरी आदी दुर्गम भागांमधील या रस्ते व पुलांमुळे पावसात या परिसराचा संपर्क टिकून राहील, वाहतूक अबाधित राहील, तसेच आरोग्य व शिक्षण व्यवस्थाही अधिक बळकट करता येईल. गडचिरोलीला विकासाच्या मुख्य धारेत आणून नक्षलवादाचा कणा मोडणे, याला सरकारचे प्राधान्य आहे.
मोठी बातमी: अभिनेता सुबोध भावेसह पत्नी व मुलाला कोरोनाची लागण
यावेळी रस्ते विकास आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग या कार्यक्रमाला उपस्तिथ होते. ते म्हणाले की, जास्तीत जास्त संपर्क रस्ते बनवल्याने या भागातील नक्षली प्रभाव कमी होईल. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नमूद केले की आज उद््घाटन होत असलेला विकास कामांमुळे दुर्गम तसेच नक्षलग्रस्त भागांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल आणि महाराष्ट्र तेलंगानाशी जोडला जाईल असे ते म्हणाले.
‘प्रशांत भूषण आगे बढो…आप के पिछे पाकिस्तान है…’, भाजप नेत्याची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

