Share

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना १ रुपयाचा दंड

Published On: 

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यावर वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी दोषी असल्याचा निकाल दिला आहे. प्रशांत भूषण यांना १ रुपयाचा दंड सुनावण्यात आला आहे. त्यांनी जर हा दंड १५ सप्टेंबर पर्यंत भरला नाही तर मात्र त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

प्रशांत भूषण यांना अवघा १ रुपयाचा दंड भरण्यास सांगितले असून जर त्यांनी तसे केले नाही तर तीन महिने कारावास वा वकिली करण्यावर ३ वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रशांत भूषण यांनी माफी मागावी यासाठी दबाव आणला जात होता मात्र, माफी न मागण्यांवर ठाम असल्याची भूमिका त्यांनी कोर्टात मांडली होती.

ब्रह्मपुरीत मदतीसाठी  हेलिकॉप्टर , पूर्व विदर्भाला पुराचा तडाखा 

यानंतर हे प्रकरण मिटवण्यावरून देशभरात चर्चा व राजकीय टिकांचे सत्र सुरु झाले होते. माफी न मागण्यावर ठाम असलेले प्रशांत भूषण हे १ रुपयाचा दंड भरणार का यावर सर्वांच लक्ष लागले आहे. जर त्यांनी हा दंड भरला तर त्यांनी केलेल्या वक्तव्य हे गुन्हा असल्याचे मान्य केल्यासारखे होईल असे म्हणले जात आहे. त्यामुळे येत्या काळात भूषण काय करतात हे महत्वाचं ठरणार आहे.

सोयाबीनच्या पिकावर कोणी केले आक्रमण, खासदार भावना गवळींचे सर्वेक्षणाचे निर्देश

काय म्हणाले होते प्रशांत भूषण?

27 जून रोजी करण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये प्रशांत भूषण यांनी 4 माजी सरन्यायाधीशांना हे लोकशाहीच्या हत्येत सहभागी असल्याचे वक्तव्य केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवर स्वार झाल्याचं एक छायाचित्र प्रसिद्ध झालं होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी उपहासात्मक टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्वीटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती.

मोठी बातमी: मोजक्या वारकऱ्यांसह प्रकाश आंबेडकरांना मंदिरात प्रवेश मिळणार?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!