अहमदनगर : १९७२ पासून जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा धरण लाखो लोकांची आणि जमिनीची तहान भागवत आहे. मात्र सध्या या धरणामध्ये जवळपास दोन टीएमसी पाणी क्षमता करील एवढा गाळ साचला आहे. हा गाळ असाच वाढत राहिला तर सिंचन आणि पिण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी मिळेल की नाही अशी भीती व्यक्त करत, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मुळा धरणातील गाळ व गाणे मिश्रित वाळू रेती काढण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या मुळा धरणात आज अडीच ते तीन टीएमसी गाळ जमा झाल्याने धरणाची जल क्षमता कमी झाली आहे. तर गाळ वाळू रेती काढून विकल्यास शासनास मोठा महसूल मिळण्यात मदत होऊन धरणाच्या जलाशयाच्या साठ्यात वाढ होईल तसेच गाळ शेतकऱ्यांना मोफत देऊन शेतीचे कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल त्यामुळे धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी तनपुरे यांनी केली.
ब्रह्मपुरीत मदतीसाठी हेलिकॉप्टर , पूर्व विदर्भाला पुराचा तडाखा
तर, ‘मेरी’ या संस्थेने निवड केलेल्या राज्यातील पाच धरणांमध्ये मुळा धरणाचा समावेश आहे, त्यानुसार या कामाची निविदा प्रक्रिया शासनाने यापूर्वीच राबवली आहे. परंतु नंतर याबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही निवड प्रक्रिया शासनाने रद्द केली होती. याबाबत न्यायालया निकाल दिल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे तात्काळ हा गाळ काढण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
सोयाबीनच्या पिकावर कोणी केले आक्रमण, खासदार भावना गवळींचे सर्वेक्षणाचे निर्देश


