Share

पुणे-अहमदनगर महामार्ग होणार सहापदरी !

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. ह्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापुर हा मार्ग सहा पदरी करण्‍यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे.

नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. हा रस्ता राज्य मार्ग असल्याने राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या सिग्नल फ्री जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसित करण्यात यावा आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ठाकरे सरकारमध्ये ‘काँग्रेस’ला कोणी विचारत नाही : भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

या बैठकीला आमदार टिंगरे यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा झाली. हा रस्ता सहापदरी करण्यासाठी जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा खर्च येईल, असा अंदाज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकर आंदोलन करण्यावर ठाम, आमच्या आंदोलनानंतर सर्व मंदिर खुली होणार असा दावा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!