🕒 1 min read
पुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पुण्यासह राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यानंतर मुठा नदीपात्रात कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. खडकवासल्यापाठोपाठ काही दिवसांतच पानशेत धरण भरले, यानंतर विसर्गात वाढ करण्यात अली होती.
तर, काही दिवसांपूर्वी खडकवासला धरण साखळीतील वरसगाव देखील पूर्ण क्षमतेने भरले असून टेमघर देखील भरण्याच्या मार्गावर आहे. या मोसमात एकूण ८.३५ टीएमसी इतका पाणीसाठा मुठा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सद्या पानशेत मधून ३ हजार ९०८, वरसगाव मधून २ हजार ६०० क्युसेक वेगाने पाणी खडकवासला धरणात पाणी सोडले जात असून खडकवासल्यातून ९ हजार ४१६ क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
विसर्गाचे ८.३५ टीएमसी पाणी मुठा पात्रात !
'खडकवासला'तून यंदाच्या मोसमात आजवर ८.३५ टीएमसी इतके पाणी विसर्गाच्या माध्यमातून मुठा नदी पात्रात सोडले असून 'खडकवासला', 'पानशेत' आणि 'वरसगाव' पूर्ण क्षमतेने तर टेमघर धरण भरण्याच्या मार्गावर आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 29, 2020
भाजपा नेते निलेश राणे यांचा कोरोना अहवाल अखेर निगेटिव्ह!
आज सकाळी ६ वाजेपर्यंत खडकवासला धरण प्रकल्पामध्ये, खडकवासला : १.९७ टीएमसी/१००%, पानशेत : १०.६५ टीएमसी/१००% , वरसगाव : १२.८२ टीएमसी/१००%, टेमघर : ३.३१ टीएमसी/८९.३४% भरले आहे. तर, एकूण पाणीसाठा : २८.७५ टीएमसी म्हणजेच ९८.६४% इतक्या पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे.
सरकारच्या पदवी परीक्षेच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

