Share

‘वारीत साप सोडण्याची अफवा करणारे म्हणतात मंदिर उघडा…’

Published On: 

सोलापूर : शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पंढरपूरच्या वारीमध्ये साप सोडला जाणार, चेंगरा चेंगरी होणार अशी अफवा उठऊन पंढरीची वारी खंडित करण्याचा डाव ज्या भारतीय जनता पार्टीने आखला, आज तीच भाजपा कोरोनाच्या महामारीत मंदिरे उघडावी म्हणून शासनाच्या विरोधात घंटा नाद आंदोलन करत आहे. त्यामुळे यांचा निषेध करावा तितका कमी असल्याचे मत शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले.

या बाबत सविस्तर बोलताना श्री नागेश वनकळसे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये आषाढी वारीला येण्यासाठी जनतेने रोखले होते. त्यावेळी त्यांनी वारीत साप सुटणार आहे, चेंगरा चेंगरी होईल त्यामुळे वारीला येणार नसल्याचा कांगावा त्यांनी केला होता. शेकडो वर्षाच्या वारीच्या परंपरेला आतापर्यंत कधीही गालबोट लागले नसताना त्यांनी आशा शब्दाचा वापर केला होता. आता तीच भारतीय जनता पार्टी ठाकरे सरकारने मंदिर उघडावे म्हणून बनावट आंदोलन करत आहे, हा त्यांचा बेगडीपणा आहे.

सर्वोच्च न्यायालय प्रशांत भूषण यांच्या ‘त्या’ याचिकेत एवढे गुंतून पडले कि..सामनाने केले न्यायमूर्तींनाच लक्ष्य

वास्तविक मंदिरे हा प्रत्येकाचा आस्थेचा विषय आहे. आणि ती उघडली पाहिजेत या बाबत शासन सकारात्मक आहे. देवदर्शनासाठी कानाकोपऱ्यातून लोक येतात मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भाविक भोळा भाव घेऊन येत असतो. कोरोनाच्या महामारीत योग्य अंतर पाळले गेले नाही, गर्दी जमली तर संसर्गाचा धोका जादा निर्माण होऊ शकतो. अजूनही कोरोनावर औषध तयार नाही हे माहिती असताना अडमुठेपणाची भूमिका भाजपा करीत असल्याचे मत सेनेचे नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले.

भाजप राज्य सरकारची जाणीवपूर्वक बदनामी करत आहे. भाजपचे पदाधिकारी आंदोलने करून राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. त्यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध अशा शब्दात नागेश वनकळसे यांनी भाजपचा आंदोलनाचा समाचार घेतला आहे.

आणखी एका नेत्याने राहुल गांधींना नेतृत्व देण्याबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!