Share

कुकडी कारखाना यंदाचा हंगाम ताकदीने पूर्ण करणार- राहुल जगताप

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अनेक अडचणी आणि मोठ्या कष्टातून कुंडलिकराव जगताप यांनी कुकडी कारखान्याची उभारणी केली. कुकडी पट्यातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना देण्यासाठी त्यांनी कसलीही पर्वा केली नाही. शेतकरी सुखाचे त्यांनी पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करीत आहोत. त्यामुळे यंदाचा हंगाम ताकदीनिशी करु असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष व श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केला.

कुंडलीकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रसामग्रीचे काल कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार राहुलदादा जगताप व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत पुजन करण्यात आले. यंदाच्या गळीत हंगामाला सामोरे जात असताना संचालक मंडळाने नऊ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवले आहे.त्याचबरोबर ऊसतोडणी व वाहतुकदारांचे करार पुर्ण करुन हप्ते वाटपही करण्यात आले आहे. गळीत हंगामामध्ये ऊसतोडणी व वाहतुकदार तसेच कामगार, शेतकरी यांची कारखाना साईटवर आरोग्याची काळजी घेण्यात येणार असून त्यादृष्टीने कारखाना तयारी करत आहे. असे जगताप म्हणाले.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वाहनावर वाळूची गाडी घालण्याचा प्रयत्न!

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब उगले, मा.उपाध्यक्ष विश्वास थोरात, जेष्ठ संचालक विवेक पवार, अंकुशराव रोडे, प्रल्हाद इथापे, कचरुमामा मोरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड, कामगार संघटनेचे अध्यक्ष कल्याणपाटील जगताप, मुख्य अभियंता भास्करराव काकडे तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला; शेलरांचा आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!