Share

महाराष्ट्र सरकारने ‘स्वतःच तोंडावर पडून दाखवले’ ; आशिष शेलरांची जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्ष वगळता परीक्षा रद्द करण्यात आल्या. तर, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशासह अन्य काही राज्यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचे देखील जाहीर केले होते. मात्र, युजीसीने अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचे निर्देश दिल्यानंतर याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

आता, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचे समर्थन केले असून आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत साथीच्या आजाराच्या दृष्टीने राज्यं परीक्षा पुढे ढकलू शकतात तसेच युजीसीच्या सोबत चर्चा करून तारीख ठरवू शकतात असा निकाल दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांबाबत निर्णय जाहीर केला असून परीक्षा रद्द करता येणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. परीक्षा घेतल्याशिवाय या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करता येणार नसल्याचे कोर्टाने सांगितले. युजीसीने ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले होता.

अंतिम वर्षांच्या परीक्षा होणारच : सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

यावरून आता विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रमाणात चिंता दाटली असली तरी दुसऱ्याबाजूला भाजपाने याचं खापर राज्य सरकारवर फोडलं आहे. भाजपाचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी ट्विट द्वारे महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातील ‘पाडून दाखवा सरकारने’ स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले! पण…विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका… परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या..यश तुमच्या वाट्याला नक्की येईल…तुमचे भविष्य उज्वलच आहे!!” असा धीर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘मी नेमका काय गुन्हा केला कि माझी बदली करण्यात आली?’ : तुकाराम मुंढे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!