Share

‘मी नेमका काय गुन्हा केला कि माझी बदली करण्यात आली?’ : तुकाराम मुंढे

Published On: 

नागपूर :  सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे राज्यभरात ओळखले जातात. त्यांच्या अनेक कारवायांमुळे त्यांना राजकीय मंडळी , व्यापारी, अवैध धंदे करणाऱ्या अनेक माफियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले असले तरी कामाची पद्धत त्यांनी कायम ठेवली असल्याचे कोरोना काळात देखील पाहायला मिळाले होते.

काही दिवसांपूर्वीच, तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्विटद्वारे सांगितले होते. सद्या ते घरीच विलगीकरणात असून तेथूनही ते कर्तव्य बजावत आहेत. याआधी देखील अनेकवेळा नागपूरचे महापौर संदीप जोशी व त्यांच्यातील वाद समोर आले होते.

सोनिया गांधी यांना एक टक्काही पाठिंबा नसावा; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांनी दिला घरचा आहेर!

तुकाराम मुंढे यांनी आता पर्यंत नागपूर जिल्हापरिषद सीईओ, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर मंदिर समिती चेअरमन, नवी मुंबई महापालिका आयुक्त, पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी, नाशिक, मंत्रालय, नागपूर महापालिका आयुक्त आदी पदभार सांभाळले असून त्यांची वारंवार बदली केली जाते. ते जिथे जातात तिथे अवैध व्यवसाय धंदे, अनियमितताला चाप लावतात, अशी त्यांची ओळख आहे.

Final year Exams: अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयात आज निकाल

तुकाराम मुंढे यांनी बदलीनंतर एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत. ‘मी नेमका काय गुन्हा केला होता की माझी बदली करण्यात आली’ असा थेट सवालही सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, ‘नागपुरात माझ्याविरोधात काही मिळेना म्हणून माझ्या चारित्र्याहिनाचे प्रकार घडवण्यात आले. महिलांना माझ्याकडे आणून कपडे फाडण्याचे प्रकार घडवले गेले’ असा धक्कादायक खुलासा तुकाराम मुंढे यांनी केला आहे.

मंत्री आला की आता त्याला दुधाने अंघोळ घाला; बारामतीत राजू शेट्टी आक्रमक!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!