Share

विनायक मेटेंमुळेच मराठा आरक्षणावर धोका निर्माण झाला असता ; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा आरक्षणाच्या याचिकांची सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करण्यात यावी यासंदर्भात कालच सुप्रीप कोर्टात निर्णय होणे अपेक्षित होते. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात आभासी कोर्टामध्ये सुनावणी सुरू असून याचिकाकर्त्यांनी आरक्षणाची सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करण्यात यावी अशी मागणी केली.

त्यामुळे मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलं होत. मात्र आता, मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) रोजी होणार आहे. दुसऱ्याबाजूला मराठा आरक्षणावरून पुन्हा राजकीय वादविवाद रंगताना दिसत आहेत.

आम्ही मुंढेंचे शत्रू नाही, पण आयुक्तांची ती भुमिका दुर्दैवी……जाणून घ्या नागपूरच्या महापौरांची प्रतिक्रिया

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणसंदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला होता. तर, महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, काही जणांनी राजकारण सुरु केलं आहे. हा विषय राजकारणाच्या पलीकडे असला पाहिजे. पण काही व्यक्ती राजकीय मतलब साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका विनायक मेटेंवर केली.

अच्छा चलता हु दुवा मे याद रखना ….. गूड बाय तुकाराम मुंढे

आता, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील विनायक मेटे यांच्यावर निशाणा साधला आहे. ” 102 व्या घटना दुरूस्तीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात पुरेसा उहापोह झाला आहे. यावरून घेण्यात आलेले आक्षेप नाकारून उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर मेटे यांनी या विषयावर याचिका दाखल करून ती मराठा आरक्षणाच्या प्रकरणाशी जोडण्याची मागणी म्हणजे मराठा आरक्षणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे”, अशी गंभीर टीका करत मराठा आरक्षणाला धोका निर्माण केला जात असल्याचा आरोप सावंत यांनी मेटेंवर लावला आहे.

बाळराजे यांच्या बार्शी एन्ट्री बाबत अनगरकर पाटील पिता-पुत्रांच्या परस्पर विरोधी फेसबुक पोस्ट…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!