🕒 1 min read
मुंबई : दरवर्षी बाप्पाचे आगमन जल्लोषात, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरावणुकींनी होत असते. बाप्पा नयनरम्य अशा देखाव्यांमध्ये विराजमान होतात. यंदा मात्र गेले ५ महिने जगभर थैमान घातलेल्या कोरोना संसर्गाचे सावट या गणेशोत्सवावर असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे जल्लोषात जरी बाप्पाचे आगमन झाले नसले तरी भक्तिभावात मात्र कोणतीही कमतरता नसल्याचे काल राज्यभरात दिसून आले.
आता मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील विविध भागातील दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात येत आहेत. मुंबईमध्ये सोशल डिस्टनसिंगच भान राखत गर्दी न करता काहींनी समुद्रात विसर्जन केले तर अनेकांनी घरच्या घरी विसर्जन केल्याचे दिसून आले आहे. तसेच, अनेक ठिकाणी फिरत्या विसर्जन हौदांची सोय केल्याने नागरिकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिल्याचे पुण्यात पाहायला मिळत आहे.
Breaking News: महाविकास आघाडीमध्ये उभी फूट? काँग्रेसचे ११ नाराज आमदार बसणार उपोषणाला
एकूणच या वर्षात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे प्रत्येक जण विघ्नहर्त्याकडे हे विघ्न संपवण्याची प्रार्थना करत आहे. काल एकदम शांततेत आगमन झाल्यानंतर आजपासून विसर्जन देखील सुरु झाले आहे. साश्रू नेत्रांनी भक्तिभावाने आता या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.
आम्हाला चार मुलं, त्याला माफी मिळावी; अटक केलेल्या इसिस दहशतवाद्याच्या बायकोची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

