Share

आम्हाला चार मुलं, त्याला माफी मिळावी; अटक केलेल्या इसिस दहशतवाद्याच्या बायकोची मागणी

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : काल दहशतवादी हल्ला करण्याचा कट सुरु असताना दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. यामुळे धक्कादायक घटना समोर येत असून पोलिसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

दहशतवादी इसिसचे असल्याची प्राथमिक माहिती असून या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणत IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. धौलकुआन येथे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या चकमकीनंतर या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठं विघ्न टळले असून या दहशतवाद्यांच नेमकं लक्ष्य काय होतं याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

महाविकास आघाडीचे मंत्री आमने-सामने; बच्चु कडूंच्या ‘प्रहारा’वर कृषीमंत्री दादा भुसेंचे प्रत्युत्तर

अबू युसूफ असं या इसिसच्या अतिरेक्याचं नाव असून त्याच्या बायकोने युसूफला माफी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यानंतर आता देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ‘त्याने गन पावडर आणि इतर साहित्य घरीच साठवले होते. जेव्हा मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला थांबवू नकोस असे सांगितले. त्याला माफी मिळावी अशी माझी इच्छा आहे. आम्हाला चार मुलं असून मी कुठे जायचं? असा प्रश्न तिने केला आहे.

सोमवारी काँग्रेसच्या कार्यसमितीची महत्वाची बैठक ; सोनिया गांधी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार?

अबू युसूफ कडून २ विस्फोटक जॅकेट, एक विस्फोटक बेल्ट, ९ किलोच्या आसपास विस्फोटक, बॉल बेअरिंग, ७ सिलिंड्रीकल बॉक्स, ४ बॅटरीज, इसिस फ्लॅग आणि एक बोर्ड ज्यावर तो बंदूक चालवण्याची तयारी करत असायचा, आदी साहित्य त्याच्या गावातील घरातून हस्तगत केले आहेत.

राज्य सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे –  जयंत पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!