Share

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात ऐरणीवर,तरीही राज्य सरकार ढिम्मचं’

Published On: 

🕒 1 min read

पुणे- आ. विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वाखाली, मराठा आरक्षण व समाजाच्या अन्य मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या मराठा समन्वय  समितीच्या वतीने आज राज्यभरात  जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले.

पुणे जिल्ह्याच्या वतीने  चिंचवड येथे डांगे चौकात, छत्रपती शिवराय पुतळ्याजवळ हे जागरण-गोंधळ आंदोलन संपन्न झाले. एक मराठा, लाख मराठा च्या घोषणेने अवघा परिसर दुमदुमून गेला !

या प्रसंगी समितीचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे म्हणाले की राज्यातील ३४% असलेल्या मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात ऐरणीवर आहे. तरीही राज्य सरकार ढिम्म राहिले आहे. मराठा प्रश्नांसाठीच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हा प्रश्न अतिशय निष्क्रियपणे हाताळत आहेत. उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी आरक्षण टिकवले त्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयात बाजूला ठेवले गेले ! व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी न करता समोरासमोर सुनावणी करावी असे पत्र देण्यातही दिरंगाई केली.

मंत्रालयातील मराठाविरोधी लॉबी नको ते कागदपत्र कोर्टात पुरवत आहेत, त्यांच्यावरही जरब राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर उपसमितीच्या अध्यक्षपदा वरून चव्हाण यांना हटवून त्याजागी प्रश्नांची जाण असलेल्या सक्षम मंत्र्यांना ही जबाबदारी सोपवणे अत्यावश्यक आहे. जर सर्वोच्च न्यायालयात काही दगाफटका झाला तर संबंधित नेते व पक्ष नामशेष होतीलच पण त्यापेक्षाही गोरगरीब मराठ्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याचे सरकारने भान ठेवावे असा इशारा देखील त्यांनी दिला.

आंदोलनाचे आयोजन समितीचे पिं-चिंचे अमित पवार, विशाल साठे, विकास झरे यांनी केले. याप्रसंगी शिवसंग्रामचे किरण ओहोळ, छावा क्रांतिवीर सेनेचे राजाभाऊ पवार, केतन गायकवाड, सौ.कलिंदि गोडांबे, बिपीन दिवेचा, बाळासाहेब चव्हाण, किशोर मुळूक, चेतन भालेकर, उर्मिला गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

राजेश टोपेंची शरद पवारांना सध्या राज्यात न फिरण्याची विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यावर ‘या’ दिग्गज भाजपा नेत्याने केला मोठा खुलासा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!