नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशवासियांशी संवाद साधला. सध्याचा काळ हा लोकशाहीसाठी कसोटीचा काळ असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. ‘सध्याचं सरकार लोकशाही व्यवस्था, राज्यघटनेची मूल्य आणि परंपरा यांच्याशी विसंगत वागत आहे. हा काळ लोकशाहीसाठी कसोटीचा आहे,’ असं सोनिया गांधी म्हणाल्या.
स्वतंत्र भारताची लोकशाही व्यवस्था बळकट करणं आणि ती शाबूत ठेवणं ही विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. लिहिणं, बोलणं, प्रश्न विचारणं, असहमत होणं, मत व्यक्त करणं इत्यादी गोष्टींसाठी देशात आजच्या घडीला स्वातंत्र्य आहे का? असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केला.
पूर्वी टाईमपास साठी ‘चला हवा येऊ द्या’ पाहायचो, आता मुलाखती पाहतो; भाजपा आमदाराची खोचक टीका
‘आज संपूर्ण जग कोरोना व्हायरसविरोधात लढत आहे. म्हणूनच या साथीला पराभूत करण्यासाठी भारताने एकजूट होण्याची गरज आहे. करोना व्हायरस आणि गंभीर आर्थिक संकटाच्या परिस्थितीतून आपण एकजुटीने बाहेर येऊ, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला,
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांच्या काळात लोकशाही मूल्ये वेळोवेळी परीक्षेत खरी उतरली आहेत आणि ती सतत परिपक्व केली आहेत. पण हे सरकार लोकशाही व्यवस्था, घटनात्मक मूल्ये आणि प्रस्थापित परंपरेविरोधात उभे आहे. भारतीय लोकशाहीसाठी हा परीक्षेचा काळ आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर केलीय.
आर. आर. आबांच्या आठवणी ताज्या; जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

