नवी दिल्ली : करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीचा पुरवठा आणि परवाना देण्यासंदर्भात नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियासोबत करार केला आहे. नोव्हाव्हॅक्सने बुधवारी ही माहिती दिली. नोव्हाव्हॅक्स अमेरिकन लस उत्पादक कंपनी आहे.
या करारामुळे नोव्हव्हॅक्सच्या भारतातील लस उत्पादनाचे सर्वाधिकार सिरमकडे असणार आहेत. नोव्हाव्हॅक्सच्या एसईसी फाईलनुसार, ३० जुलै रोजी हा करार झाला. नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या लसीचे प्राथमिक स्तरावर अपेक्षित निकाल मिळाले आहेत. सप्टेंबरपासून नोव्हाव्हॅक्स तिसऱ्या फेजची चाचणी सुरु करेल. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.
‘मी आजही संयम ठेऊन आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे म्हणजे आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का?
ऑपरेशन वार्प स्पीड अंतर्गत अमेरिकेने करोनावरील लस निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीला १.६ अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली होती. एखाद्या कंपनीला लस निर्मितीसाठी देण्यात येणारा आतापर्यंतचा हा सर्वाधिक निधी आहे. अमेरिकेने अन्य कंपन्यांना सुद्धा करोनावरील लस निर्मितीसाठी निधी दिला आहे.
चिमुकल्यांना कोरोनामुक्त करणारे बालरोग तज्ञ डॉ. दिलीप मोरे यांचे कोरोनाने निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
