Share

राम मंदिर भूमिपूजन : मुस्लिम कुटुंब 501 दिवे पेटवून देणार हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या आयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. या अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी राम जन्मभूमीवर उपस्थित होणार आहेत. इथे ते नागरिकांनाही संबोधित करणार आहेत. अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी साकेत विद्यापीठातून रामजन्मभूमीकडे रवाना होतील. यावेळी पंतप्रधान मोदी हनुमानगढीलाही भेट देतील. भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय.

दरम्यान, एका बाजूला एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून पंतप्रधानांवर टीका केली आहे. “पंतप्रधानांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधातील आहे,” असं मत ओवेसी यांनी व्यक्त केलं. तर दुसऱ्या बाजूला अयोध्येत या दिनी दिपोत्सवही साजरा करण्यात येणार आहे. भूमीपूजनाच्या दिवशी हिंदू मुस्लिम ऐकोप्याचा संदेश एक मुस्लिम कुटुंब 501 दिवे पेटवून देणार आहे. पूर्वापार चालत आलेल्या गंगा-जमुनी-तेहझीब या परंपरेचे पालन हे मुस्लिम कुटुंब करणार आहे.

देशातील काही नेते मंडळी हा एकोपा तोडण्गंयासाठी भडक वक्गातव्ये करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला या कुटुंबाने उचललेल्या या पावलामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे. गंगा-जमुनी-तेहझीब ही पुर्वापार चालत आलेली हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांच्या एकोप्याचा संदेश देणारी संस्कृती आहे. दोन्ही धर्मांची वैशिष्ट्ये एकमेकांत असून प्रेमानेे दोन्ही धर्मांनी एकत्र राहण्याचा संदेश यातून देण्यात येतो. बाबुल खान यांच्या कुटुंबियांकडून या परंपरेचे पालन करण्यात येत आहे. बाबुल खान यांनी राम मंदिर अभियानालाही पाठिंबा दिला होता. आता 5 ऑगस्टला दिपोत्सव साजरा करण्याची त्यांची तयारी सुरु आहे.

धक्कादायक : गर्भात असतानाच बाळाला कोरोनोचा संसर्ग;ससून रुग्णालयात घडली दुर्मिळ घटना

नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी; आरटीई कायदा आता १२वी पर्यंत लागू होणार

पक्षश्रेष्ठींची माफी मागा आणि पुन्हा पक्षात या; गेहलोत यांची पायलट समर्थक आमदारांना ऑफर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!