मुंबई: आज मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हीरकमहोत्सवी म्हणजेच ६० वा वाढदिवस आहे. ठाकरेंवर अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच एका शुभेच्छापर पोस्टची चर्चा जास्त होत आहे. ती म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री १२ वाजताच दिलेल्या शुभेच्छा व त्यासोबत शेअर केलेला फोटो!
हा फोटो, जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारामती दौऱ्यावर गेले होते त्यावेळी काढलेला असून यात एका गाडीत उद्धव ठाकरे व अजित पवार बसले आहेत. मात्र, यात एक खास गोष्ट आहे जी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणजे, अजित पावरांच्या हातात असलेलं स्टेअरिंग. त्यामुळे, नेहमीच रोखठोक स्वभावाने परिचित असलेले दादा या फोटोतुन काही खुणावू पाहत आहेत का?यावर मात्र आता अनेक चर्चा रंगत आहेत. ज्याच्या हाती स्टेअरिंग तो गाडी चालवतो, तसंच या सरकारचे स्टेअरिंग नक्की कोणाच्या हाती याचा अंदाज आपण लावु शकतो.
वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रात्री १२ वाजता अजित दादांच्या खास शुभेच्छा!
काल संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग देखील प्रसिद्ध करण्यात आला, ज्यात ठाकरेंनी अनेक खुलासे आहेत. यातील एका प्रश्नात, विरोधक हे तीन चाकी सरकार असून कधीही पडेल असे सांगतात यावर उत्तर देताना ते म्हणाले, हे तीन चाकी रिक्षाचे सरकार असून स्थिर आहे. ज्यात सरकारचे स्टेअरिंग माझ्या हातात आहे तर दोघे मागे नीट बसले आहेत.
मुंबईसह राज्यात दमदार! पावसाची पहाटेपासूनच बॅटिंग सुरु
दरम्यान, या पोस्टमध्ये अजित पवारांनी, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे.” अशा शब्दांत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
राजकीय गोंधळ राजस्थानात पडसाद उमटतात महाराष्ट्रात, कॉंग्रेसचे मुंबईत आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
