Share

कोकण गणेशोत्सव: चाकरमान्यांना क्वारंटाईन १४ दिवसांचाच, २५ गावांच्या सरपंचांचा निर्णय

Published On: 

सिंधुदुर्ग: कोकणातील गणेशोत्सव आणि चाकरमानी हे समीकरण पिढ्यांपिढ्यांचं आहे. यंदा मात्र, गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असून चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी अनेक आव्हानांना समोर जावे लगण्याचं चित्र सद्या पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आला असताना अजूनही सर्व नियमावलीत स्पष्टता नसल्याने चाकरमान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाईन झाल्याशिवाय खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश मिळणार नाही. २५ गावांच्या सरपंचाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात गणेशोत्सवानिमित्त गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अटी आणि शर्तीसह एसटीने प्रवास करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सिंधुदुर्गातील २५ गावांच्या सरपंचाची बैठक झाली. यासंदर्भात टीव्ही ९ ने वृत्त दिले आहे.

“नगरसेवक हरवले आहेत, आजारात सोडलत आता आम्ही मतदान करताना सोडतो!”

तर, “एसटीची सेवा तर उपलब्ध होईल. त्यामुळे लोकांना एसटी उपलब्ध करुन द्याव्या लागतील. पण अटी शर्थींची पूर्तता करुन हे सर्व करावं लागेल. कोकणात गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली होती. कोकणातील लोकप्रतिनिधींनी १४ दिवसांच्या क्वारंटाईन मध्ये शिथिलता देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तर नितेश राणे यांनी क्वारंटाईन नकोच, अशी मागणी केली होती.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको – अमित देशमुख

याच पार्श्वभूमीवर खारेपाटण पंचक्रोशीतील आणि रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील २५ गावच्या सरपंचाची बैठक झाली. यामध्ये गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाईन झाल्याशिवाय खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत, हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!