Share

श्रावणात तरी मंदिरं खुली करा, शिवसेना नेते चांद्रकांत खैरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

Published On: 

संभाजीनगर: कोरोना महामारीच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर राज्यातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिरं, इतर प्रार्थना स्थळे तसेच खाजगी व सरकार कार्यालये देखील मर्यादित प्रमाणात बंद करण्यात आले होते. तर जूनमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुनःश्च हरिओम म्हणत टाळेबंदीमध्ये शिथिलता आणली होती.

अनेक राज्यात तेव्हा मंदिरं देखील खुली करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रातील स्थिती बघता तेव्हा राज्यातील मंदिरांसह सर्वच प्रार्थना स्थळांना बंदच ठेवण्यात आले. आता, हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात झाल्याने मंदिरं सुरु करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. तर हि मागणी शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच केली आहे.

सात दिवसांत माफी मागा नाहीतर… सचिन पायलटांचा थेट इशारा

“आता श्रावण महिना सुरु झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पूजापाठ बंद आहे. निदान श्रावण महिन्यात तरी महादेवांचं दर्शन आणि पूजन व्हायला हवं. श्रावण महिन्यात महादेवाचं पूजन आणि दर्शनाला खूप महत्त्व असतं. त्यामुळे श्रावण महिन्यात लाखो नागरिक महादेवाची पूजा करतात आणि मंदिरात दर्शनासाठी जातात”, यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी  प्रतिक्रिया दिली.

तुमच्या डोक्यावरचे केस कमी झाले का? संजय राऊत यांचा उद्धव ठाकरेंना रोखठोक सवाल

तसेच, सोशल डिस्टन्सिंग पाळून भाविकांना मंदिरात सोडलं जावं. भाविकांना महादेवाच्या पिंडावर निदान बेलाचं पान वाहता यावं. महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहेत. सर्व ज्योतिर्लिंगांची पूजा करुन कोरोना नष्ट व्हावा, अशी प्रार्थना करु. पूजेसाठी नियम पाळता येतील. सोशल डिस्टिन्सिंग पाळून धार्मिक विधी करता येतील”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

भरती आणि पदोन्नतीतील मागासवर्गीयांच्या संविधानिक अधिकारांची जपणूक व्हावी – नाना पटोले

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. “महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाल आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करावेत का, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. मात्र लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,” असे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता यासर्व गोष्टींवर कोरोनाचे संकट बघता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे देखील महत्वाचे आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!