नवी दिल्ली : 22 जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभेच्या चेंबरमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळण्यासाठी 61 सदस्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात घेऊन, या कार्यक्रमादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
यात भाजपचे राज्यसभेचे नवनियुक्त खासदार डॉ. भागवत कराड यांचा देखील समावेश आहे. मार्च महिन्यात त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. कराड हे गोपीनाथ मुंडे गटाचे निष्ठावंत नेते समजले जातात. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि बिल्डर असलेले संजय काकडे यांना डावलून भाजपने कराडांना राज्यसभेची जागा दिली होती. कराडांची नियुक्ती करताना पंकजा मुंडे यांना विश्वासात घेतलं नाही अशी राजकीय चर्चा नंतर सुरु झाली होती. तर पंकजा मुंडे ज्या वंजारी समाजातून येतात त्याच एकमुखी नेतृत्व पंकजा यांच्याकडे असल्याने कराड यांना खासदार करत हे नेतृत्व भाजप बदलू इच्छित असल्याच्या देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या.
मोठी बातमी : देशातील ‘हे’ राज्य पूर्णपणे झालं लॉकडाऊन मुक्त
यावर आता खुद्द भागवत कराडांनी खुलासा करत असा कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं. ‘पंकजा मुंडे आणि माझ्यात कुठलाही वाद नाही. मला राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा फोन आला. त्यानंतर पंकजा मुंडे यांचाही फोन आला होता. त्यामुळे त्यांना माझ्या उमेदवारीची माहिती होती. दिल्लीत येण्याआधीही त्यांनी मला शुभेच्छा दिल्या’. अस कराड म्हणाले आहेत. माझा फॉर्म भरतांनाही त्या उपस्थित होत्या त्यामुळे आमच्यात वाद असल्याच्या कुठल्याही गोष्टीत तथ्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. गोपीनाथ मुंडे यांचा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे. मुंडे साहेबांनीच आपल्यालाला राजकारणात आणलं अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली आहे.
भागवत हे 1995 ते 2009 पर्यंत 3 वेळा औरंगाबादचे नगरसेवक होते. 1999 आणि 2006 असे दोन वेळा औरंगाबादचे महापौर होते. 2009मध्ये भाजपातर्फे औरंगाबाद पूर्व मतदार संघातून निवडणूक लढवली पण पराभूत झाले.भाजपमध्ये शहर सरचिटणीस, शहर जिल्हाध्यक्ष, मनपा गटनेता व भटक्या विमुक्त आघाडीचा अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.
कमी चाचण्यांमुळेच कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

