Share

‘तो’ अजेंडा पवारांच्या पक्षाचा असेल, आमचं हिदुत्व जगजाहीर ; शिवसेना आमदाराने सुनावलं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. राम मंदिर बांधून कोरोना जाईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही, अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती यानंतर चांगलेच राजकारण तापले.

यावर आता शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पवारसाहेब जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. शिवसेनेचं हिंदुत्व जगजाहीर आहे. त्यामुळे पवारांनी राम मंदिराबाबत केलेलं वक्तव्य हे सरकार एकत्र आल्यामुळे केलंय, असं नाही. भाजपने वाटोळं केलंय. आता राम मंदिरावरुन राजकारण करु नये”, असं आवाहन सरनाईक यांनी केले आहे.

‘बाबर आक्रमक होता हे सिद्ध झालंय, बाबरी खटला बेकायदेशीर आहे’

राम मंदिराबाबत कोणीही राजकारण करु नये. भाजपने वाटोळ केलं. महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्यांवर एकत्र आली आहे. तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा जगजाहीर आहे. आमच्या पक्षाच्या भूमिकेबाबत कोणीही प्रश्न उपस्थित करु नये”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. पवारसाहेब जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. त्यांनी तो स्वीकारला आहे, त्यांनी ते विधान केले आहे, ते सरकार एकत्र आल्यामुळे नाही. रामजन्म भूमिपूजनावरुन कोणीही राजकारण करु नये, असं प्रताप सरनाईकांनी नमूद केलं.

राम मंदिर मुद्दा हा देशात नसून जगात गाजत आहे. राम मंदिरबाबत एकच वाघ (बाळासाहेब ठाकरे) मागणी करत होता हे सर्वांना माहिती आहे. गेले 28 वर्ष आंदोलन चालू होते. आता न्यायालयाचा निर्णय आला आहे. 5 ऑगस्ट ही तारीख भूमिपूजनासाठी निश्चित केली आहे. यामध्ये शिवसेनेचं मोठं योगदान आहे. राम मंदिरासाठी 1 कोटीचा निधीही शिवसेनेकडून दिला आहे, अशी आठवण प्रताप सरनाईकांनी सांगितली.

‘या देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असचं भाजपला वाटतं आहे’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!