मुंबई : महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवरून यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना टोला हाणला आहे. ‘आमच्या संपर्कात भाजपच्या १०५ आमदारांपैकी काही आमदार असल्याची बातमी बाहेर आल्यानंतर फडणवीसांना दिल्लीला जावं लागलं,’ असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
‘आम्ही एक आहोत, असं स्पष्टीकरण त्यांना आपल्या पक्षश्रेष्ठींना द्यावं लागलं, पण त्यांच्या समर्थनासाठी पुढे कोण आलं? राम कदम, प्रविण दरेकर, प्रसाद लाड. समर्थनासाठी पुढे आलेली ही मंडळी मुळात भाजपची आहेत का?’ असा सवाल यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे. ‘विरोधी पक्षनेते एकटे पडले आहेत, असं चित्र आहे आणि मूळ भाजपची मंडळी घरातच बसलेली आहेत. महाराष्ट्रात उलटा चमत्कार होणार ही वास्तविकता आहे,’अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात एकीकडे करोनाने हाहाकार माजवला आहे. अशात दुसरीकडे राजकीय वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघत आहे. कारण भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल असा गौप्यस्फोट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. आमचे कोणी फुटणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पुणे, ठाणे नंतर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊन
मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता राजस्थानमध्ये भाजपाने आपला घाणेरडा खेळ आणि घाणेरडे राजकारण सुरुच ठेवले आहे. शेणातला किडा ज्याप्रमाणे शेणातच राहतो तसं यांचं झालं आहे. केंद्रात सत्ता मिळाली असतानाही त्यांना राज्यांमध्ये फोडाफोडी करण्याची हाव आहे. मला सातत्याने महाराष्ट्रामध्ये काय असे विचारले जाते. माझं सर्वांना सांगणं आहे राज्यातलं सरकार स्थिर आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने देशाला नवे राजकीय समीकरण दिले असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री ज्यांना घेऊन फिरत आहेत ते बाहेरुन आलेले लोक आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा पक्ष किती दुर्बळ झाला आहे हे दिसत आहे. त्यांच्या १०५ पैकी आमचे किती लोक तिकडे गेले आहेत आणि ते कधीही परत येतील, याबद्दल तुम्ही हमी देऊ शकत नाही. उलट १०५ पैकीच काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
कोरोना उपचारासाठी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
