🕒 1 min read
पुणे : जगभरात कोरोना व्हायरसमुळे जी वैश्विक महामारी आली आहे, त्याचा परिणाम आता सर्वच क्षेत्रांवर दिसू लागला आहे. त्यात अनेक क्षेत्र अक्षरश: होरपळून निघत आहेत. अशात माध्यम क्षेत्रही त्याला अपवाद ठरलं नाही. अनेक छापिल माध्यमे, ऑनलाईन माध्यमे ही सध्या संकटाच्या काळातून जात आहेत. काही वर्तमानपत्रे बंद झाली आहेत तर काही फक्त डिजीटल स्वरुपात उरली आहेत. अनेक वेबपोर्टल या काळात बंद झाली आहेत की शेवटच्या घटका मोजत आहेत.
मात्र, अशातही आशेचा किरण म्हणजे काही वेबपोर्टल चांगली कामं करत आहे. ही पोर्टल वाचकांपर्यंत सतत ताज्या घडामोडी, चांगले लेख किंवा खरी माहिती पोहचविण्याचं काम करत आहे. याचमुळे जी वेबपोर्टल संकटातून जात आहे त्यांना गुगल किंवा फेसबुकसारख्या मोठ्या कंपन्या मदत करत आहे. शेवटी या कंपन्यांसाठीही ही वेबपोर्टल कंटेंट क्रिएशनचं मोठं काम करत आहेत.
अशा या युद्धप्रसंगी गुगलने मराठी भाषेतल्या एका वेब पोर्टलला गगन भरारी घेण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. ही किमया ज्या वेब पोर्टलच्या मालकांनी केली आहे, तो मराठवाड्यासारख्या अतिशय ग्रामीण भागातून आलेला आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात येऊन त्याने आपली कंपनी स्थापन केली, नुसती कंपनी स्थापन केली नाही तर ती नावारूपाला आणली आणि माध्यमांच्या स्पर्धेमध्ये तिने तिचे अस्तित्व निर्माण केले. हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुलानी वाडगाव या गावचा मनोज जाधव हा तरुण आहे.
आनंदाची बाब अशी की, enrich media प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंतर्गत येणाऱ्या ‘कृषीनामा’ या शेतीविषयक घडामोडी लोकांपर्यंत पोहचविणाऱ्या मराठी वेबपोर्टलची गुगलने यासाठी निवड केली. प्रादेशिक भाषेत येत असलेली अनेक पोर्टल सध्या चांगलं काम करत आहे. त्यांना असा मदतीचा हात मिळणे ही सुखावह बाब आहे. तसेच या खास प्रवासात गुगलसारख्या मोठ्या कंपनीबरोबर नाव जोडलं जाणं निश्चितचं आनंद देणारी गोष्ट आहे.
पुण्यात कडकडीत लॉकडाऊन पण उरुळीमध्ये मात्र पाण्यासाठी प्रचंड झुंबड
याबद्दल बोलताना enrich media प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज जाधव म्हणाले, ‘गुगलकडून अशी मदत मिळने ही मोठी गोष्ट आहे’. आम्ही सतत कंटेंटच्या दर्जावर भर देत आलो आहे. सातत्य व दर्जा या दोन गोष्टींवरच कृषीनामा पोर्टल उभे राहिले आहे. अशात गुगल कधी आपली निवड करेल याचा विचार केला नव्हता. परंतु शेवटी चांगल्या कामाचे फळ मिळाले असेच म्हणावे लागेल.
सुमारे, जगभरातील बारा हजार कंपन्यांमधून गुणवत्ता दर्जा आणि आणि नियमित अपडेट या आधारावर आणि आणखी काही निकषांवर जगभरातील पोर्टलस् ची चाचणी घेतली गेली. त्यातून दोनशे कंपन्यांना आर्थिक पाठबळ गुगल दिले त्यामध्ये मनोज जाधव यांच्या कृषीनामा या वेब पोर्टलचा समावेश आहे.
दरम्यान, enrich media प्रायव्हेट लिमिटेड ही पुणेस्थित कंपनी महाराष्ट्र व देशातील अनेक पोर्टलसोबत तांत्रिक मदत, रेव्हेन्यु जनरेशन, पोर्टल उभारणी तसेच सोशल मीडिया एंगेजमेंटसाठी काम करते. गेल्या तीन वर्षात १२० हुन अधिक पोर्टलसोबत ही कंपनी काम करत आहे. अशात कंपनीच्या स्वत:च्या पोर्टलला अशी मदत मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. येणाऱ्या काळात कृषीनामाच्या माध्यमातून अधिकाधिक कृषीविषयक कंटेंट निर्मितीचं काम केलं जाईल. उत्साह जसा वाढला आहे, तशी जबाबदारीही वाढली आहे. थॅंक्यू गुगल…!!!
मराठा आरक्षण: अशोक चव्हाणांनी केला सुप्रीम कोर्ट सुनावणी बद्दल मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
