🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊन मध्ये जात आहेत. मागील २४ तासांत २८ हजार ४९८ नवे रुग्ण आढळले असून, ५५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
देशभरातील कोरोनाबाधितांची संख्ये आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे कि, देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९ लाख ६ हजार ७५२ वर पोहचली आहे. यामध्ये अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ३ लाख ११ हजार ५६५ असून, आतापर्यंत ५ लाख ७१ हजार ४६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत देशभरात २३ हजार ७२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
India's #COVID19 case tally crosses 9 lakh mark with 28,498 new cases & 553 deaths reported in the last 24 hours.
Total positive cases stand at 9,06,752 including 3,11,565 active cases, 5,71,460 cured/discharged/migrated and 23,727 deaths: Ministry of Health pic.twitter.com/EnYWzKOTDB
— ANI (@ANI) July 14, 2020
काल (दि.१३) पर्यंत देशभरात १ कोटी २० लाख ९२ हजार ५०३ नमूण्यांची तपासणी केली गेली आहे. यातील २ लाख ८६ हजार २४७ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती ‘आयसीएमआर’ कडून देण्यात आली आहे.
1,20,92,503 samples tested for #COVID19 till 13th July, of these 2,86,247 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/xzJJ2HaY3g
— ANI (@ANI) July 14, 2020
राज्यभर वीज बिलांची होळी केली जाणार,राजू शेट्टी आक्रमक
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी
कोरोनाचा उद्रेक; कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाखांच्या जवळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

