नवी दिल्ली : जगात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यासोबतच भारतात पण कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत देशात २६ हजार ५०६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे, तर ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आठ लाखांच्या जवळ पोहचली आहे. गेल्या २४ तासांत वाढलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण सात लाख ९३ हजार ८०२ इतके झाले आहेत तर एकूण कोरोनाबळींची संख्या २१ हजार ६०४ इतकी झाली आहे.
देशात दररोज २० हजारांच्या पुढे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीही उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण आधिक आहेत. देशात दोन लाख ७६ हजार ६८५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर चार लाख ९५ हजार ५१३ जणांनी करोनावर मात केली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० टक्केंपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
India reports 475 deaths and the highest single-day spike of 26,506 new #COVID19 cases in the last 24 hours. Positive cases stand at 7,93,802 including 2,76,685 active cases, 4,95,513 cured/discharged/migrated & 21,604 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/13boGr8aVK
— ANI (@ANI) July 10, 2020
देशात कोरोना रुग्णाची विक्रमी वाढ, इटलीला मागे टाकत भारत सहाव्या स्थानावर
मुंबईत शिथिलता दिली तर कोरोनाबाधितांची संख्या वाढेल : उद्धव ठाकरे
‘मंदिरे, देवस्थाने सुरु करुन त्यात मर्यादित संख्येने भजन-किर्तन, पूजा-अर्चना करण्याची परवानगी द्या’

