🕒 1 min read
नाशिक- महाराष्ट्रात कोरोणाचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीचे नेते एकाबाजूला पुन्हा लॉकडाऊन होऊ देणार नाही अशी वल्गना करीत असताना आता अनेक शहरात पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे व कल्याण महापालिकेपाठोपाठ आत्ता भिवंडी महानगर पालिकेनेही लॉकडाऊन वाढवला आहे.
भिवंडी क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणखी सात दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमिवर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करा, तसेच धार्मिक विधी आणि इतर व्यवसायांना परवानगी द्या, अशी मागणी पुरोहित संघाने मुख्यमंत्र्यांकडे तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करण्यात आली आहे.
18 मार्चपासून त्र्यम्बकेश्वर मधिल सर्व व्यवहार ठप्प असून अनेकांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे, त्र्यंबकेश्वर नगरीतिल सर्व व्यवसाय हे भाविक आणि पर्यटकांवरच अवलंबून असून श्रावण महिन्यात तर इथे उत्सवच साजरा होत असून या काळात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर या मागणीवर विचार करावा, कोरोनाबाबत सर्व खबरदारीच पालन आम्ही करू अशी विनंती करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुणे व्यापारी महासंघाचा लॉकडाऊनला विरोध मावळला,सहकार्य करण्याचे दिले आश्वासन
संजय राऊतांनी थेट फडणवीसांना दिले आव्हान; पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिम्मत दाखवावी !
गेहलोत सरकारवरील संकट महाराष्ट्रातील ‘हा’ धुरंधर नेता करणार दूर, राजस्थानाकडे रवाना होण्याची सूचना
भारत – नेपाळच्या मैत्रीत चीनने फूट पाडू नये; पुण्यातील नेपाळी नागरिकांच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

