मालेगाव : ‘बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजने’द्वारे शेतकऱ्यांना सबसिडी देवून त्यांना पाठबळ दिले जाणार आहे. त्यामुळे फार्मर प्रोड्युसर कंपनीने बागलाण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोबत घेवून काम करावे. प्रोड्युसर कंपनी, गटशेती अशा पद्धतीने काम करणारे शेतकरी व त्यांच्या कंपन्यांच्या मागे शासन खंबीरपणे उभे असून शेतकरी बांधवांना चिंतामुक्त व समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मत, राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
बागलाण येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी दादा भुसे यांनी बागलाण तालुक्यातील खते व बियाणे पुरवठ्याची माहिती घेत पिकांची पाहणी केली. तसेच सीताफळ लागवड, शेतीशाळेचे उद्घाटन व इमोमेक्टीन वाटपाचा कार्यक्रमही संपन्न झाला. यावेळी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ व प्रशिक्षण वर्गातील शेतकरी उपस्थित होते.
दादा भुसे म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकविलेला माल, प्रक्रिया केलेला माल तसेच हा माल ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे काम फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभे केले जाणार आहे. ‘मा.बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजने’द्वारे शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र यावे, गटशेती करावी तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यतातून विकासाकडे वाटचाल करावी, असे आवाहनही मंत्री दादा भुसे यांनी केले.
‘भाजपा’त प्रवेश करणार नाही; सचिन पायलट यांनी केला मोठा खुलासा
नाशिक जिल्हा बँकेला सुमारे ८७० कोटींचा निधी कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने वर्ग करण्यात आलेला आहे व याच निधीतून शेतकऱ्यांना पीककर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देशही जिल्हा बँकांना देण्यात आल्याने ‘महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेला’ आता गती मिळेल. तसेच मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग सक्षम असून, तशा उपाययोजना राबविण्यासाठी कृषी विभागाला सूचना देण्यात आल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
अर्लीद्राक्षाच्या संदर्भातील प्रश्नांवर येत्या आठवड्याभरात जाणकार व निर्यातदारांसोबत बैठक घेवून प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. तसेच केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पीक विमा संदर्भातील विमा ऐच्छिक करण्यात आला आहे. तशी मुभा शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन घेता येणार आहे, यासाठी एकच नमुन्यातील अर्ज राहणार असून या ऑनलाईन प्रक्रियेमुळे सर्व योजनांमध्ये पारदर्शीपणा येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सोलापुरात १७ ते २६ जुलैपर्यंत संपूर्ण टाळेबंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

