दिल्ली: राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगामुळे कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. यासह राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत.राज्यामध्ये गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये बेबनाव सुरू असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभुमीवर या सर्वजणांनी गेहलोत यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर पायलट यांचे निकटवर्तीय असलेले कॉंग्रेसमधील काही आमदार दिल्लीमध्ये काल पासून मुक्काम करत आहेत. या आमदारांमध्ये राजस्थान कॉंग्रेस अध्यक्षांचाही समावेश आहे.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून ते भाजपा मध्ये प्रवेश करणार अशा चर्चाना उधाण आले आहे. मात्र आपण भाजपा मध्ये प्रवेश करणार नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. पायलट हे भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार असून त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा केली जाईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र सचिन पायलट यांनी एनडीटीव्ही शी बोलताना हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
‘ती’ तर आमची चाल, सत्तास्थापनेवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
दरम्यान, राजस्थानातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. सचिन पायलट यांनी अहमद पटेल यांना भेटून आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याबरोबर मतभेद विकोपाला गेल्याचे त्यांनी सांगितले. अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार समजले जातात.
सचिन पायलट यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेहलोत यांच्याबद्दलचा तक्रारीचा पाढाच वाचून दाखवला असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका सूत्रांने सांगितले. सचिन पायलट यांनी काँग्रेसचे दुसरे वरिष्ठ नेते के.सी.वेणूगोपाल यांची सुद्धा भेट घेतली. गेहलोत आणि पायलट यांच्यामध्ये फारसे सख्य नाही हे पक्षात सर्वांनाच माहित आहे. २०१८ साली जेव्हा काँग्रेसने राजस्थान विधानभा निवडणुकीत २०० पैकी १०७ जागा जिंकल्या, तेव्हा मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला होता. सचिन पायलट मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम होते. त्यावेळी तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पायलट यांची समजूत काढून उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना राजी केले होते.
आणखी एका जिल्ह्यात होणार १५ ते 30 जुलै दरम्यान लॉकडाऊन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

