🕒 1 min read
मुंबई : अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या सौम्य लक्षणे आढळली असून नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. शनिवारी रात्री उशीरा बिग बींनी ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. आता अभिनेता धर्मेंद्र यांनी देखील ट्विटद्वारे बिग बींसाठी प्रार्थना केली आहे.
बिग बींना करोनाची लागण झाल्यामुळे धर्मेंद्र यांनी ट्विट केले कि, “अमित, लवकर तंदुरुस्त हो. मला माझ्या लहान भावावर विश्वास आहे. तो एक दोन दिवसांत बरा होऊन घरी परतेल. जया तुम्ही चिंता करु नका. सर्व काही ठिक होईल. माझी धाडसी मुलगी… घरातील सर्वांना सांभाळ… मी कायम तुमच्यासोबत आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन धर्मेंद्र यांनी बिग बींसाठी प्रार्थना केली आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Amit , get well soon. I am sure of my courageous younger brother……he will soon be fit and fine in a day or two …Jaya, don’t worry…every thing will be fine my brave baby….Look after yourself and everyone at home…..Love you all……take care ????. ????????????????????
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 12, 2020
दरम्यान, अमिताभ, अभिषेक यांच्या पाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या बच्चन यांनाही संसर्ग झाला आहे. दोघींनाही नानावटी रुग्णालयात नेले जाण्याची शक्यता आहे. बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
पुणे : लॉकडाऊनच्या धास्तीने मार्केटयार्डमध्ये पहाटेपासूनच उसळली गर्दी
अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण
#corona : राजभवनमधील आता 24 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

