Share

संतापजनक: डोंबिवलीमध्ये वापरलेले पीपीई किट टाकले उघड्यावर, कामगारांच्या जीवाला मोठा धोका

Published On: 

🕒 1 min read

डोंबिवली: अहमदनगर मध्ये कोरोना स्वॅब चाचणीसाठी वापरलेले पीपीई किट योग्यरित्या विल्हेवाट न करता घंटागाडीत टाकण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता डोंबिवलीतील धक्कादायक वृत्त समोर येत आहे. त्यामुळे वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असलेल्या खासगी कंत्राटदारांवर असलेला राजकीय वा अधिकाऱ्यांचा हात मात्र सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे.

डोंबिवली येथील एमआयडीसी फेज २ मध्ये डोंबिवली नागरिक सहकारी बँक आणि दुर्वांकुर हॉलच्या मधल्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात कोरोना उपचारासाठी रुग्णालयात वापरले जाणारे पीपीई किट आणि इतर वापरलेले साहित्य म्हणजेच बायो मेडिकल वेस्टेज मोठ्या प्रमाणात पोटी भरून टाकले जात असल्याची माहिती दक्ष नागरिक मंगेश कोयंडे यांनी दिली. हा कचरा कोण टाकतं याबद्दल माहिती नसून, संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.

परीक्षांबाबत घेतलेला निर्णय हास्यास्पद,एचआरडी आणि यूजीसीवाले दुसऱ्या विश्वातून आले आहेत काय ?

तसेच या जागेच्या आजूबाजूला खासगी कंपन्या, महावितरण आहे. त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांचा, सोनारपाडा, निवासी विभागातील लोकांचा वावर इथे असतो. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे लक्ष घालावे आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. याबाबतचे फोटो कोयंडे यांनी सोशल मिडियावर व्हायरल केल्यानंतर नागरिकांनी महापालिकेच्या सफाई विभागावर टीकेची झोड उठवली. हे वृत्त लोकमतच्या बातमीनुसार समजत आहे.

तर अहमदनगरदमधील एका केंद्रामध्ये देखील धक्कादायक बाब समोर आली आहे.स्रावाचे नमुने घेणासाठी डॉक्टर पीपीई किटचा वापर करतात. दररोज, ३ ते ४ किटचा वापर नमुने घेताना त्याची लागण डॉक्टरांना होऊ नये म्हणून केला जातो. नमुने घेऊन झाल्यानंतर या किटची विल्हेवाट लावताना योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे परंतु हे किट घंटागाडीमध्ये टाकले जात असल्याचे समजते. जर, योग्य काळजी घेतली गेली नाही तर या किटमुळे देखील कोरोना संसर्ग होण्याचा धोका असतो.

रुग्णांना दाखल करायला जागा नसताना ‘विप्रो’ ने दिलेले आयते रुग्णालय पडले धूळखात !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!