Share

प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे नागरिकांचे हाल; भाजपच्या ‘या’ खासदारानी लॉकडाऊनला केला विरोध !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील कोरोनाचा कहर या आटोक्याबाहेर असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने पुणे जिल्ह्यासह, औरंगाबाद, ठाणे, नांदेड या शहरांतील लॉकडाऊन हा पुन्हा वाढवला असून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयावरून भाजपा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती दिली.

“ठाणे आणि पुणे शहरातील स्थितीबदल केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे नागरिकांचे होणारे हाल आणि व्यापाऱ्यांचे नुकसान याची सविस्तर कल्पना त्यांना दिली. संविधानाच्या मर्यादेतच पण केंद्राने अहवाल मागवून कार्यवाही करण्याची विनंती,” त्यांनी केली असल्याचे सहस्त्रबुद्धे म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली असून लोकसत्ताने सदर वृत्त दिले आहे.

दरम्यान, लोकडाऊनला व्यापारी महासंघाचा विरोध असून करोनावर लॉक डाउन हे औषध होऊ शकत नाही, अशी भूमिका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पुणे शहराच्या लॉकडाऊनवर मांडली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘आता पुण्यात लॉकडाउनच्या घोषणेमुळे व्यापारी वर्गाला आणखी संकटांना सामोरे जावे लागणार आहे. आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.’

धारावीतील कोरोना कंट्रोलप्रकरणी किरीट सोमय्यांनी केली प्रशासनाची पोल-खोल!

तर पुण्याचे खासदार आणि माजी पालकमंत्री भाजप नेते गिरीश बापट यांनी, ‘मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण 3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका,’ अशा शब्दात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

…तर महाविकास आघाडीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रामदास आठवले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!