🕒 1 min read
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने वेण्णा तलाव तुडुंब भरुन सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. महाबळेश्वर तालुक्यात मागील काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. हा तलाव भरल्याने महाबळेश्वर व पाचगणीच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
महाबळेश्वरमध्ये जून महिन्याच्या प्रारंभी आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या प्रदुर्भावाने परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. त्यानंतर जून महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरु राहीला. जूनच्या अखेरीस मात्र शहर व परिसराला पावसाने झोडपून काढले.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाची धुवाँधार सुरू झाली. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तमाम महाबळेश्वर – पाचगणीकरांची तहान भागविणारे आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण वेण्णा तलाव तुडुंब भरला. याशिवाय बुधवारी सायंकाळी वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले. याच वेण्णालेकमधून महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असल्याने वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. अनेक पर्यटन पॉइंट्स प्रसिद्ध असून हा परिसर म्हणजे निसर्गाची किमयाच आहे. पावसाळ्यात अनेक धबधबे या भागात असतात तसेच प्रतापगड हा देखील जवळच असल्याने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागातुन लोक खास मौज-मजेसाठी येत असतात. यंदा मात्र, कोरोनामुळे ३ महिने लॉकडाऊन होते. तसेच अजून देखील पर्यटकांना जिल्हा बंदी असल्याने महाबळेश्वर हे आता रिकामे आहे. स्ट्रॉबेरी चा हंगाम देखील लॉकडाऊन मध्ये गेल्याने येथील शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते.
महाबळेश्वमध्ये थंडीच्या तीव्रतेत वाढ
प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर झाली ‘या’ महत्वाच्या विषयांवर चर्चा
‘शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या कॉमेडीयन अग्रिमाने सर्वांची जाहीर माफी मागावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
