Share

‘शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या कॉमेडीयन अग्रिमाने सर्वांची जाहीर माफी मागावी’

Published On: 

मुंबई : मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने विनोदातून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. अखंड भारताचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा करताना तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे देशातील समस्त शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अग्रिमा म्हणाली की, शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी इंटरनेटच्या सोर्सवर गेली तर त्याठिकाणी सगळं कोरं होतं. कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तृप्ती देसाई (संस्थापक अध्यक्षा भूमाता ब्रिगेड) यांनी या प्रकरणी अग्रीमावर कारवाईची मागणी केली आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत देसाई म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अनेक वेळेला बदनामी करण्याचा काही मानसिकतेचा प्रयत्न होत असतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आदर्श सगळेच महापुरुष असतील त्यांच्याबाबत विनोदातून खिल्ली उडवणे किंवा बदनामी करणे असे अनेक वेळा प्रयत्न केले जातात.त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अजिबात धक्का पोहोचत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे मनामनात, प्रत्येकाच्या हृदयात कोरलेले आहेत. परंतु विनोदाची पातळी थेट महापुरुषांची खिल्ली उडवणे किंवा देवी देवतांबद्दल अनेक वेळेला बोलणे इथपर्यंत हे कॉमेडियन घेऊन जातात ते पूर्णपणे चुकीचे आहे.अशांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर महिला सन्मान त्यावेळी सर्वांना शिकवला नसता तर आज सदर कॉमेडियन स्टेजवर सन्मानाने कॉमेडी करताना दिसली नसती. कॉमेडीतून छत्रपती शिवरायांचा केलेला एकेरी उल्लेख आणि बदनामी यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे सदर कॉमेडीयन अग्रिमा जोशुआ यांनी सर्वांची जाहीर माफी मागावी अशी मागणी देसाई यांनी केली.

यावर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया देत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी राज्य सरकार कधीच खपवून घेणार नाही, अस म्हंटल आहे. या स्टँडअप कॉमेडियच्या व्हिडीओची तपासणी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात येतील. या व्हिडीओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील आणि काही आक्षेपार्ह असेल तर तात्काळ त्यावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही शंभुराज देसाई यांनी दिली आहे.

बजाज कंपनीच्या १४ कामगारांचा मृत्यू ; ‘या’ शहरात आजपासून कडकडीत लॉकडाऊन

‘पीक विमा योजनेच्या फायद्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा’

होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल – मोहोळ

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!