Share

मुंबईप्रमाणे ठाण्यातही मृतांची संख्या लपवली ? ८०० नागरिकांचा कोरोनाने मृत्यु झाल्याची शंका

Published On: 

🕒 1 min read

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुंब्रा येथील एका दफनभूमीतच कोरोना व कोरोना संशयित १४२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्यावरून मुंबईप्रमाणेच ठाण्यातही मृतांची संख्या दडपण्यात येत आहे. ठाण्यात ८०० नागरिकांचा कोरोनाने मृत्यु झाल्याची शंका असून, त्यातील ४०० मुंब्र्यातील आहेत, असा आरोप भाजपाचे ठाणे प्रभारी व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. तर मुंब्र्यातील ४ पैकी दोन दफनभूमी क्षमता संपल्यामुळे बंद केल्या. उर्वरित दोन्ही दफनभूमी महिनाभरात बंद पडतील, याकडे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले.

मोठी बातमी: महाराष्ट्रात ‘या’ शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन  

कोरोनामुळे ठाणे शहरातील परिस्थिती गंभीर होत असल्याबरोबरच विविध उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी तत्कालीन आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेतली होती. त्यावेळी ठाणे महापालिकेकडून मृतांची संख्या लपविली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाबाबत महापालिका प्रशासनाला खात्री देण्यासाठी श्री. सोमय्या, निरंजन डावखरे, महापालिकेतील भाजपा गटनेते संजय वाघुले यांनी आज मुंब्र्याचा दौरा केला. तेथील चारही दफनभूमीतील नोंदीनुसार माहिती घेतली.

त्यावेळी एम एम व्हॅलीनजीकच्या एका स्मशानभूमीत कोरोना व कोरोना संशयित म्हणून तब्बल १४२ नागरिकांचे दफनविधी झाले असल्याचे तेथील रखवालदाराने व कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. २२ मार्चपासून दररोज १४ ते १५ मृतदेह येत होते. त्यामुळे मुंब्रा-कौसा भागात कोरोनामुळे तब्बल ४०० जणांचे मृत्यू झाल्याचा संशय आहे. तर ठाणे शहरात ही संख्या ८०० पर्यंत आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.

मुंब्रा दफनभूमीत मार्चमध्ये ७४, एप्रिलमध्ये १६० आणि २३ जूनपर्यंत १७३ नागरिकांचे मृत्यू झाले. कौसा दफनभूमीत मार्चमध्ये ६३, एप्रिलमध्ये ८२, मेमध्ये २४० आणि २३ मेपर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २७७ मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. मात्र, मुंब्रा-कौसा भागातच १ एप्रिल ते २३ जूनपर्यंत ९५३ नागरिकांचे दफनविधी पार पडले आहेत.

कोरोनाशी झुंजत असताना पंकजाताईने फोन केल्याच्या आनंद झाला, धनुभाऊ झाले भावूक

कोरोनामुळेच मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे, याकडे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे किरीट सोमय्या यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. दरम्यान, या दौऱ्यात दफनभूमीतील कर्मचारी पीपीई किटविना कार्य करीतअसल्याचे आढळले. त्यावेळी त्यांना भाजपाच्या वतीने पीपीई किट देण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!