Share

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत पुण्यात सात हजार कोटींची गुंतवणूक; मिळणार १० हजारांपेक्षा अधिक रोजगार

Published On: 

पुणे : उद्योग विभागाच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या दुसऱ्या पर्वात पुणे व परिसरात तब्बल सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सोमवारी झालेल्या सामंजस्य करारांबाबत विस्तृत माहिती अद्याप पुणे विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडे आलेली नाही, पण विभागाच्या आयुक्तांकडून लवकरच ही माहिती प्राप्त होईल. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर ही येणारी गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

या सामंजस्य करारांनुसार दहा हजारांपेक्षा जास्त रोजगार पुण्यात उपलब्ध होणार आहे. तसेच या उद्योगांना पूरक इतर उद्योगांमधूनही मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.

याबाबत माहिती देताना उद्योग पुणे विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे म्हणाले, ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत सोमवारी जगभरातील विविध कं पन्यांशी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांपैकी सहा करार पुणे व परिसराशी निगडित आहेत. त्यानुसार सात हजार कोटींची गुंतवणूक पुणे जिल्ह्य़ात होणार आहे’.

पुढे ते म्हणाले, ‘या करारांपैकी ग्रेटवॉल मोटर्स या प्रकल्प पुण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून त्यातून रोजगारनिर्मिती, आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरेल. कारण ही इलेक्ट्रिक वाहने तयार करणारी चीनमधील आघाडीची कं पनी आहे. या कंपनीचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास पुण्यातील उद्योग विश्वासाठी आश्वासक बाब ठरू शके ल. पुण्यात ऑटोमोबाइल इंडस्ट्रीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा असून या उद्योगांसाठीचे पूरक उद्योगही आहेत, तसेच या उद्योगासाठी आवश्यक कौशल्याधारित मनुष्यबळ उपलब्ध आहे’.

‘जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांनीच महाराष्ट्र घडला, यापुढेही घडत राहील’ – अजित पवार

उंडाळकर काकांनी घेतली पृथ्वीराज बाबांची भेट, मुलासाठी विधानपरिषदेची साखर पेरणी ?

पत्रलेखन स्पर्धेत राज्यपालांनी पटकावलं प्रथम पारितोषिक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!