Share

बिथरलेले पाकडे म्हणतात, भारत लडाखमध्ये सर्जिकल स्ट्राइक का करत नाही?

Published On: 

नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करण्याची पाकिस्तानची तशी जुनीच सवय आहे. मात्र आता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एक प्रश्न विचारून स्वतःच आणि पाकिस्तानचे हसं करून घेतले आहे.

कोकणवासियांच्या पाठिशी संकटकाळात ठामपणे उभे राहू – देवेंद्र फडणवीस

ओडिशा जनसंवाद रॅलीला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमाभागात तणाव निर्माण करणाऱ्या चीन आणि पाकिस्तान या राष्ट्रांना भारतीय सीमाभागात अतिक्रमण करणे म्हणजे काही पोरखेळ नाही, अशा शब्दात सुनावले होते.

शाह यांनी दिलेल्या चिथावणीचा कुरेशी यांना चांगलाच झटका बसला. हा झटका इतका जोरात बसला की भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना भारत लडाखमध्ये सर्जिकल स्ट्राइक का करत नाही? असा हास्यास्पद प्रश्न विचारला आहे.

शिक्षकांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष, महाराष्ट्र टीचर असोसिएशनने पुकारला एल्गार

कुरेशी यांनी उसणे अवसान आणत भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील केला. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार कुरेशी यांनी असेही म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइकची चूक करू नये, कारण स्वतःचे संरक्षण कसे करावे हे इस्लामाबादला माहीत आहे. पाकिस्तान नेहमीच शांततेबद्दल बोलतो. पण निरपराध लोकांच्या जीवाशी भारत खेळत आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात असलेल्या सरकारवर अल्पसंख्यांक असमाधानी असल्याचे शाह महमूद कुरेशी म्हणाले. त्याचबरोबर, भारतातील सत्ताधारी भाजपा आपले अपयश लपविण्यासाठी पाकिस्तानला दोष देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही शाह महमूद कुरेशी यांनी केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!