रवी उगलमुगले/शेवगाव : महाराष्ट्र टीचर असोसिएशनने आज राज्यभर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी व 20 टक्के अनुदानासाठी संघटनेच्या वतीने ‘ रोड उतरो ‘ आंदोलन कले. हे आंदोलन मार्गदर्शक संस्थापक तथा राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.शेवगाव येथे देखील आज महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या वतीने शेवगावचे तहसीलदार यांना निवेदन देऊन ‘ रोड उतरो ‘ आंदोलन केले, या आंदोलनामध्ये राज्य सरकारचा निषेध शिक्षकांच्या वतीने करण्यात आला.
परराज्यात जाणाऱ्या नागरिकांनसाठी पहा, ‘लालपरी’ किती धावली?
राज्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शिक्षक विनाअनुदानित तत्वावर काम करत आहेत. 13 सप्टेंबर 2019 रोजी शासनाने अनुदानासाठी घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना मंजूर झालेले अनुदानाच्या वितरणाबाबतशासन आदेश काढून शिक्षकांना तत्काळ पगार करण्यात यावे ही मुख्य मागणी या वेळी करत शिक्षकांनी हे आंदोलन केले. यावेळी बोलताना महिला जिल्हा अध्यक्ष सौ.रूपा देशमुख यांनी एक तर, अनुदान द्या, नाहीतर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या, अशी तोंडी मागणीही या वेळी रूपा देशमुख यांनी यावेळी केली.
वित्त विभागाच्या उदासीनतेमुळे शिक्षकांना एक वर्ष होऊन देखील प्रत्यक्ष अनुदान जाहीर करण्याचा शासन जीआर काढण्यात आला नाही, त्यामुळे सर्व शिक्षक हे प्रत्यक्ष अनुदानापासून वंचित असून शासनाच्या वेळकाढूपणा पणाचा शिक्षकांच्या वतीने निषेध करण्यात आला. अनेक वर्षांपासून अनुदानापासून वंचित असलेल्या शिक्षकांना तातडीने अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
८० वर्षाच्या लढवय्याचा कोकण दौरा : म्हसळा येथील नुकसानग्रस्त मदरशाला दिली भेट
यावेळी शिक्षकांच्या वतीने शेवगाव च्या तहसीलदार अर्चना भाकड तसेच व गट शिक्षण अधिकारी रामनाथ कराड यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष,वाघमारे यशोदास, महिला जिल्हाध्यक्ष सौ रूपा देशमुख, तालुकाध्यक्ष महेश गाडे व अन्य शिक्षक या वेळी उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

