पुणे : कोरोना आपत्तीत पुणे शहरात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या कामाला मी 100 पैकी 100 मार्क देतो असे सांगून पाटील यांनी, पालकमंत्री अजित पवार यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. पवार यांचा स्वभाव पाहता, कोरोना आपत्तीत त्यांनी खाड खाड निर्णय घेणे अपेक्षित होते पण तसे त्यांनी केले नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
हार्दिक पंड्या बाप होणार हे पाहून नताशाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणाला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील वर्षपूर्तीनिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा पाटील यांनी ‘झूम’द्वारे पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या वर्षभरातील मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ठाकरे सरकारला केलेल्या मदतीची आकड्यानिशी माहितीही पाटलांनी दिली. त्याचवेळी त्यांनी ठाकरे सरकारबद्दल नाराजीचा सूरही ठेवला. तेव्हा पुण्यातील स्थितीबाबत महापौर मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री अजित पवार यांचे निर्णय, परिणामासंदर्भात विचारले असता, पाटील मोहोळांवर खूष तर पवारांच्या कामाकडे बोट दाखविले.
पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला.पुण्यातील करोनाची परिस्थिती हाताळणाऱ्या महापौर मोहोळ यांनी जीवाची काळजी न करता या कामात स्वत:ला झोकून दिले असल्याने त्यांना यात शंभर गुण देत आहोत, असे ते म्हणाले. तेव्हा उपमुख्यमंत्री पवार यांना किती गुण देणार, या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी ‘पवार अशा काळात शांत कसे आहेत, याचे आश्चर्य वाटते’ अशी टिप्पणी केली.
अमेरिकेत कोरोना लसीचे 20 लाख डोस तयार, वितरणासाठी वाहतूक व्यवस्था सज्ज; ट्रम्प यांचा दावा
‘पवार यांच्या स्वभावानुसार अशा गंभीर काळात त्यांच्याकडून दररोज ‘खाड खाड’ निर्णय होणे अपेक्षित होते. तसे होताना दिसत नसून ते बोलतही नाहीत. ते सध्या का बोलत नाहीत, हे शोधायला लागेतल,’ अशी टोलाही पाटील यांनी या वेळी लगावला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
