Share

शेतकरी हिताचे मोठे निर्णय घेतल्यानंतर रयतने उधळली मोदी सरकारवर स्तुतीसुमने

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा व एक देश एक बाजार धोरणाला मंजुरी देऊन शेतकऱ्याच्या पायातील कायद्याच्या बेड्या काढण्याच्या कामाची सुरवात केली आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करत आहेत .या ऐतिहासिक निर्णयांचे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केले.

आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर केल्याप्रमाणे केंद्र सरकारने *जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्तीचा निर्णय बुधवारी (दि.०३) केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, याबरोबर *’एक देश,एक कृषी बाजार’* या धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही मुक्तपणे शेतीमाल विक्रीची मुभा देणारा अध्यादेश काढला जाणार आहे असे जाहीर केले.

‘प्रस्तावित वीज (सुधारणा) विधेयक बिल 2020 मुळे घटनेवर घाला घालून संघराज्य रचनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न’

सन १९५५ पासून चालत आलेल्या जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केली जाणार असून तेलबिया, खाद्यतेल,कडधान्य, बटाटे, कांदे हे जिन्नस प्रतिबंधात्मक यादीतून वगळण्यात आले आहे. या उत्पादनावर साठवण मर्यादा लागू राहणार नाही. प्रक्रिया उद्योग, पुरवठा व्यवसायातील व्यवसायिक,निर्यातदारांही साठवणी मर्यादेचे बंधन नसेल.अपवादात्मक परिस्थिती बदल होईल.
एक देश,एक बाजार या धोरणाला मंजुरी देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल देशातील कोणत्याही राज्यात,मार्केट मध्ये विकता येणार आहे.शेतकऱ्यांना स्थानिक कृषी बाजारावर अवलंबून न राहता जिथे अधिक दर मिळेल तिथे विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.आंतर राज्यविक्रीची कोणत्याही परवानगीची गरज या नव्या कायद्यामुळे राहणार नाही असे शिंदे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे पंचप्राण स्व.शरद जोशी यांनी केलेली मागणी आता प्रत्यक्षात उतरत आहे देर आये पण दुरुस्त आये म्हणाव लागेल .आमचे नेते आ.सदाभाऊ खोत यांनी कृषी राज्यमंत्री असताना राज्यात भाजीपाला नियमनमुक्त केले होते आणि कडधान्ये नियमनमुक्त करण्याचे विधेयक मागच्या सरकारच्या काळात मांडले होते पण सभागृहांमध्ये ते मंजूर होऊ शकले नाही.व सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता या मागण्याला आता यश मिळाले आहे त्याबद्दल सदाभाऊ खोत यांचे सुध्दा हार्दिक अभिनंदन करतो असे शिंदे यांनी म्हटले आहे.

धक्कादायक : खाजगी हॉस्पिटलमधील रूग्ण बेड, अतिदक्षता – व्हेंटिलेटर बेड मुंबईकरांना उपलब्धच झालेले नाहीत

केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे यांची अंमलबजावणी राज्य सरकारला कराव लागेल तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. राज्य सरकारला आठवण करून देण्यासाठी व मोदी सरकारचे अभिनंदन करून आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने (दि.८/०६) सोमवारी स्वागत करणार आहोत अशी माहिती पांडुरंग शिंदे यांनी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!